मुंबई: तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रत्येकाच्या हाती आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. एका क्लिकवर आपल्या जगभरातील बातम्या, व्हिडीओ आणि गेम्सचा आनंद लुटता येतो. मात्र या मनोरंजनाचं कधी व्यसनात बदल होतो, हे कळत सुद्धा नाही. अनेक मुलं बघता बघता मोबाईल गेमच्या आहारी जात आहेत. हे व्यसन जीवावर देखील बेततं. अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. आईने मोबाईलवर गेम खेळायला मनाई केल्याने 16 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. धावत्या लोकलखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण?
आत्महत्येची घटना मुंबईतील दिंडोशी भागातील आहे. 16 वर्षीय मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. या प्रकारामुळे त्याची आई कंटाळली होती. घटनेच्या दिवशी आईने रागाच्या भरात त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याच्यावर ओरडली. आईचा रौद्ररुप पाहून 16 वर्षीय मुलाला राग अनावर झाला. त्याने सुसाईड नोट लिहून घर सोडलं. आई घरी आल्यानंतर तिला मुलाने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटमध्ये अल्पवयीन मुलाने आत्महत्या करणार असून घरी परत येणार नाही, असं लिहिलं होतं.



कुटुंबियांनी सुसाईड नोट मिळताच पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली आणि मुलाचा शोध सुरु केला. तेव्हाच पोलिसांना अंधेरी मालाड दरम्यान कोणीतरी आत्महत्या केल्याचं कळलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहनिशा केली असता तो मृतदेह त्याचाच असल्याचं स्पष्ट झालं. या घटनेनंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


यापूर्वीही घडल्या आहेत घटना
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. गेम खेळण्यास रोखल्याने 16 वर्षाच्या मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली होती. या मुलाला गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. काही दिवसांपूर्वी मुंबई देखील PUBG गेम खेळत असताना वैमनस्यातून तीन मित्रांनी ठाण्यातील एका रहिवाशाची चाकूने वार करून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली होती.