मुंबई : मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये रुग्णांना जलद गतीने सेवा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या 'मोटर बाईक अॅम्ब्युलन्स' उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी या महत्त्वकांक्षी सेवेला प्रत्यक्षात आणलं. सध्या दहा बुलेट बाईक या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून पुढील काळात त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.


मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आलीय. त्यासाठी आरोग्य सेवेचा प्रशिक्षित आणि मुंबईच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलाय.


वाहतूक कोंडीत रुग्णाच्या अत्यावश्यक 'गोल्डन हवर'मध्ये तसेच राज्याच्या दुर्गम भागात हा उपक्रम आरोग्य सेवा जलद गतीने उपलब्ध करून देण्यात महत्वाचे योगदान देईल असा यावेळी व्यक्त करण्यात आला.