Sanjay Raut gets bail: तब्बल 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानंतर अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला. हा निकाल येताच राऊत आणि (Shivsena) शिवसेना- ठाकरे गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी अनेकांच्या नजरा राऊतांच्या कुटुंबीयांकडे आणि प्रामुख्यानं त्यांच्या आईकडे गेल्या. लेकाला जामीन मिळाल्याची बातमी कळतात राऊतांच्या आईला भावना अनावर झाल्या. (Sanjay rauts mother reaction)


वाचा : Sanjay Raut : संजय राऊत 102 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराच्या खिडकीपाशी येऊन समोर उभ्या असणाऱ्या समर्थकांपुढे हात जोडत ही माय दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि निस्वार्थ साथीसाठी आभार मानताना दिसली. यावेळी त्यांनी रोखून धरलेले अश्रू अगदी सहजपणे त्यांच्या चेहऱ्यावरील भावांवाटे व्यक्त होत होते. 




राऊतांना जामीन मंजूर होताच पत्नीची काय प्रतिक्रिया? 


राऊतांना जामीन मिळणं म्हणजे खऱ्या अर्थानं पक्षाची विजयी घोडदौड सुरु झाल्याचं म्हणत आपल्याला अत्यानंद झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांनी दिली. यावेळी त्यांनी आपण मातोश्रीच्या दिशेनं जात असल्याचंही सांगितलं. 


आपण न्यायालयातून बाहेर येताच राऊतांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी स्पष्टपणे दिसत होता, अशी माहितीही त्यांनी दिली. कोर्टाचं कामकाज सुरळीत चालल्यास सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राऊत बाहेर पडतील अशी आशा त्यांच्या पत्नीनं व्यक्त केली. 


जामिनाचा निकाल देत न्यायालयानं काय मत मांडलं? 


दरम्यान, अखेरच्या सुनावणीवेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. आज याबाबत अंतिम सुनावणी करताना त्यांना जामीन मंजूर केला आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना मोठा दिलासा दिला. 


घरातून निघताना आईने ओवाळलेलं तो क्षण आजही सर्वांना आठवतोय... 


ईडी (ED) चे अधिकारी राऊतांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांच्या घरी पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्या आईचे डोळे पाणावले होते तो क्षण आजही सर्वांच्याच डोळ्यांसमोरून गेलेला नाही. लेकाला संकटात पाहून काय करावं हेच राऊतांच्या आईला कळत नव्हतं. यावेळी घरातून निघण्यापूर्वी त्यांनी आईला घट्ट मिठी मारत तिला धीर दिला होता, तिच्या पाया पडत आशीर्वादही घेतले होते. 

राजकीय डावपेच आणि हेवेदावे सगळं बाजूला, पण आज ही माय सर्वात जास्त आनंदी आहे हेच स्पष्ट होतंय. शेवटी कितीही झालं, तरी आशीर्वाद फळले आहेत अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.