Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली आहेत. सकाळी 9 ते 10 वेळेत सर्व राजकीय नेत्यांची धाकधूक वाढते. 10 वाजून 10 मिनिटांचीच वेळ का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, ही जी सकाळची वेळ आहे ती ठरवली नसून ती मीडियाने ठरली आहे. गेल्या तीन वर्षांपासून मीडियाचे लोक येतात, तेव्हा माझी सामना कार्यलयात जाण्याची वेळ असते. लोकांना भेटेपर्यंत 10 वाजतात. तिथे तुमचे सर्व बूम लागलेले असतात. तिथे पोहोचेपर्यंत 10 वाजून 10 मिनिटे झालेली असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे 10 वाजून 10 मिनिटांची ही वेळ मी ठरवलेली नाहीये. पण 10 वाजून 10 मिनिटांनीच महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळवून दिला. त्यावेळी आम्ही सांगत होते की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. 30 ते 35 दिवस साधारण ही वेळ 10 वाजून 10 मिनिटेच होती. त्यामुळे आमच्यासाठी तो लकी वेळ आहे. जशी सकाळ वेळ, संध्याकाळ वेळ तशीच ही संजय वेळ असेल असं देखील संजय राऊत म्हणाले. 


तुम्ही सकाळी नरेटिव्ह सेट करता? 


पुढे संजय राऊत म्हणाले की, जेव्हा मी सामना कार्यालयातून खाली उतरतो. तेव्हा माझ्या डोक्यात किंवा मनामध्ये कोणताही विषय किंवा प्रश्न नसतो. जे प्रश्न मीडियाकडे असतात त्याची फक्त मी उत्तरे देत असतो. जर तुम्ही नरेटिव्ह सेट करता असं म्हटलं तर. त्यानंतर तुमचं दिवसभर चालू राहते. मी आजपर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे फेक नरेटिव्ह हे खोटं आहे. 


महाराष्ट्रावरच्या अन्यायाविरोधी भूमिका


संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेसाठी जाहीर सभा ह्या नवीन नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये 50-55 वर्षे जाहीर सभाच्या माध्यमातूनच राज्याच राजकारण केलं. लोकमत वळवलं. परंतु या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळत आहे. लोकसभेचा निकाल लागून फक्त 100 दिवस झाले आहेत. लोकसभेचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला आहे. 


लोकसभेत सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी केल्या नसत्या तर आम्ही 35 जागा जिंकलो असतो. पण आता आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहोत. ही लढाई महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. महाराष्ट्रावरील अन्यायाविरोधी आम्ही लढणार आहेत.