महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची संधी, पदवीधरांनी `येथे` पाठवा अर्ज
MPCB Mumbai Job: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अंतर्गत एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
MPCB Mumbai Job: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची संधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक ही पदे भरली जातील.
पदाचा तपशील
प्रादेशिक अधिकारी 2 जागा, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीची 1 जागा, वैज्ञानिक अधिकारीच्या 2 जागा, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीच्या 4 जागा, प्रमुख लेखापालच्या 3 जागा, विधी सहायकच्या 3 जागा, कनिष्ठ लघुलेखकच्या 14 जागा, कनिष्ठ वैज्ञानिक सहायकच्या 16 जागा, वरिष्ठ लिपिकच्या 10 जागा, प्रयोगशाळा सहायकच्या 3 जागा, कनिष्ठ लिपिक/टंकलेखकच्या 6 जागा अशा एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पदानुसार 19 हजार 900 ते 2 लाख 8 हजार 700 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना19 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदभरतचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्रीय लोकसेवा आयोगात नोकरीची संधी
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उपसचिव स्तर सल्लागार पदाच्या भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 6 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यूपीएससीने उपसचिव किंवा समकक्ष पदावरून निवृत्त झालेल्या लोकांसाठी ही भरती जाहीर केली आहे. भारत सरकारच्या कोणत्याही मंत्रालय किंवा विभागातून 7 व्या CPC (पूर्व-सुधारित GP-7600/- PB-3 मध्ये) नुसार वेतन मॅट्रिक्सच्या स्तर-12 मध्ये पदापासून, उपसचिव किंवा समकक्ष पदावरून निवृत्त असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. यासोबतच उमेदवारांना भारत सरकारच्या कोणत्याही मंत्रालय किंवा विभागातील डिर्टी सेक्रेटरी किंवा अंडर सेक्रेटरी स्तरावर दक्षता आणि शिस्तभंगाची प्रकरणे हाताळण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराला कॉम्प्युटर अॅप्लीकेशन्सवर काम करता येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 64 वर्षांपर्यंत असावे. उमेदवारांनी आपले अर्ज केंद्रीय लोकसेवा आयोग, अंडरसेक्रेटरी (प्रशासक), रूम नंबर 11, अॅनेक्स बिल्डिंग (तळमजला), ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.