मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार होत्या. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता सरकारने या परीक्षांची घोषणा केली असून आता 4 सप्टेंबरला या परीक्षा (MPSC Exam 2021) होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची वाट पहात होते. 2020 मध्ये होणारी ही संयुक्त पूर्व परीक्षा 6 वेळेस पुढे ढकलली होती. 806 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. PSI/ STI/ASO या पदांसाठी ही परीक्षा होत आहे. परीक्षा रद्द किंवा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची भावना होती. त्या विरोधात पुणे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात आंदोलनं झाली होती.


कोणत्या पदासाठी किती जागा 


सहाय्यक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा


राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा


पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा


एकूण - 806 जागा