मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेले अनेक दिवस संप सुरु आहे. अनेक चर्चा आणि बैठकांनंतरही या संपावर तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे. तर संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. या सगळ्यात प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवाहन करुनही संपकरी कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने आता कारवाईचा जोर वाढवला आहे. एसटी महामंडळाच्या निशाण्यावर आता एसटीतले रोजंदार कर्मचारी आले आहेत. आज राज्यातल्या तब्बल 2 हजार 296 रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस एसटी महामंडळानं बजावली आहे. 


महत्त्वाचं म्हणजे एकूण 2 हजार 584 पैकी 2 हजार 296 कर्मचाऱ्यांना ही नोटीस देण्यात आलीय. त्यामुळं या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. 


2,296 कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस


29 चालकांपैकी 25 जणांना नोटीस
2188 चालक तथा वाहकांपैकी 2101 जणांना नोटीस
182 वाहकांपैकी 131 जणांना नोटीस
97 सहाय्यकांपैकी 22 जणाना नोटीस
88 लिपीक-टंकलेखकांपैकी 16 जणांना नोटीस



आज हजर असलेले कर्मचारी
दरम्यान, आज 7400 एस टी कर्मचारी कामावर हजर होते. हजेरी पटावरील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 92,266 आहे. चालक,वाहक,कार्यशाळा आणि प्रशासकीय विभागातील 7400 कर्मचारी कामावर हजर असल्याची माहिती एस टी महामंडळाने दिली आहे. आज विविध एस टी आगारातून चार वाजेपर्यंत 103 एस टी बसेस बाहेर पडल्या. त्या मधून 2756 प्रवाश्यांनी प्रवास केला.