मुंबई :  मुकेश अंबानी हे नाव देशातील सर्वात श्रीमंतांपैकी एक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोट्याधीश अंबानींच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती तुम्हांला असेल परंतू त्यांच्या सेवेला असणार्‍यांचं आयुष्य कसं आहे ? त्यांची लाईफस्टाईल कशी आहे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. 


मुकेश अंबानी मुंबईतील एंटीलिया या अलिशान घरामध्ये राहतात. त्यांच्याकडे ५०० हून अधिक गाड्या आहेत. सोबत प्राईव्हेट जेटदेखिल आहे. 
मुकेश अंबानी त्यांच्या ड्रायव्हर्सची निवड कशी करतात सोबतच त्यांचा पगार किती आहे याबबतचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


मुकेश अंबानीच्या ड्रायव्हरचा दरमहा पगार सुमारे २ लाख रूपये आहे. सामान्य ड्रायव्हर्सचा पगार हा महिन्याला फारतर २०,००० रूपये इतका असतो. 


मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरर्सची निवडही अत्यंत पारखून केली जाते. त्याकरिता काही कंपन्यांना कॉन्ट्रक्ट दिले जाते. निवड झाल्यानंतर ड्रायव्हर्सना खास प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच मुकेश अंबानींची कार चालवण्याची परवानगी दिली जाते.