नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अब्जाधीश हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहता सोबत झाला. हा साखरपुडा समारंभ २४ मार्च रोजी गोव्यात संपन्न झाला. गोव्यात पार पडलेल्या या सेरेमनीनंतर अंबानी यांनी मुंबईत एक ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींसह क्रिकेटर्सनेही हजेरी लावली.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबानी हाऊस अँटिलियामध्ये श्लोका आणि मुकेश अंबानी यांच्यासाठी एका ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


आकाश अंबानीने केली विनंती


व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आकाश अंबानी आपल्या घराबाहेर उभे राहून फोटोग्राफर्सला एक खास विनंती करत आहे.


आकाश अंबानीने फोटोग्राफर्सला म्हटलं...


पार्टीनंतर मीडिया समोर फोटो काढण्यासाठी आकाश आणि श्लोका बाहेर आले. मात्र, दूर असल्याने फोटोग्राफर्सने आकाश आणि श्लोकाला विनंती करत पुढं येण्याची विनंती केली. त्यानंतर आकाश अंबानीने पुढं येत पोज दिली. यावेळी आकाशने फोटोग्राफर्सला असं काही म्हटलं जे ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. देशातील सर्वात श्रीमंत परिवारातील मुलाने फोटोग्राफर्सला म्हटलं 'चांगला फोटो छापा हा".



सोशल मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडिओ बॉलिवूड क्लबने पोस्ट केला आहे. यामध्ये आकाश अंबानी हा श्लोकासोबत घराबाहेर मीडियासमोर पोज देत आहे.


मुंबईत होणार साखरपुडा


आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा डिसेंबरमध्ये मुंबईत होणार असल्याचे बोलले जातेय. मात्र त्याआधी अँटिलियामध्ये यासाठी पार्टी ठेवण्यात आली होती. डिसेंबरमध्ये हे लग्न होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाची तारीख फिक्स झालीये. ८-१२ डिसेंबरदरम्यान लग्नाचा सोहळा पार पडेल. मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये सेरेमनी आयोजित करण्यात येईल.