मुंबई : मुंबईसह राज्यभरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remedisivir injection) मागणी देखील वाढतेय. दरम्यान या इंजेक्शनचा साठा आणि काळ्या बाजाराने विकल्याच्या घटना समोर येतायत. अंधेरीतल्या मरोळमध्ये रेमडेसिवीरचा साठा (Remedisivir injection Stock) जप्त करण्यात आलाय. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या दोन हजार बॉटल्सचा साठा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत हा साठा जप्त करण्यात आलाय. तसेच 200 रेमडेसिवीर इंजेक्शन मरिन लाईन्समधूनही ताब्यात घेण्यात आली आहेत. अशा एकूण 2200 बॉटल ताब्यात घेण्यात आल्या आहेत.



लसीकरण केंद्र बंद 


मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. 31 खासगी लसीकरण केंद्र बंद आहेत. सोमवारी फक्त 35 हजार 309 नागरिकांचंच लसीकरण झालं. त्यातले दहा हजारजणांचं दुसऱ्या डोससह लसीकरण पूर्ण झालंय. तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणात साठा कमी पडल्यानं वेग मंदावला. मुंबईत सध्या 129 केंद्र आहेत. पालिकेची 39, राज्य आणि केंद्राची 17आणि खासगी 73 केंद्र आहेत.


महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 


राज्यात 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,40,75,811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 3 (16.19टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 37,43,968 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत.  तर 27,081 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.