मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची ही साखळी मोडण्यासाठी आणि आणखी प्रभावीपणे मुंबईत काम करण्यासाठी पालिकेच्या सात झोनमध्ये सात सनदी अधिकारी नेमण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांना रूग्णांची संख्या रोखण्यासाठी नमूद करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची २० हजाराच्या पार गेली आहे. आणि सर्वात जास्त रूग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी, वरळी, मुंलूड, कुर्ला, भायखळा या परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. यामुळे मुंबईत भीतीचं वातावरण आहे. 


मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये रूग्णांची संख्या वाढत आहे. हीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून सात झोनमध्ये विशेष लक्ष देण्यासाठी सात सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 


झोनची जबाबदारी 


झोन १ अश्विनी भिडे - फोर्ट ते भायखळा
झोन २ मनीषा म्हैसकर - मांटुगा, परळ, वरळी, दादर, माहीम, धारावी 
झोन ३ डॉ. रामस्वायी - वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले, जोगेश्वरी पूर्व
झोन ४ सुरेश काकाणी - विले पार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम, मालाड, कांदिवली
झोन ५ संजीव जयस्वाल - चेंबुर, कुर्ला 
झोन ६ अश्विनी भिडे - घाटकोपर भांडूप, मुलूंड
झोन ७ पी. वेलारासू  - कांदिवली ते दहिसर 


अधिकाऱ्यांना देण्यात आलंय टार्गेट 


अधिकाऱ्यांना रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दहा दिवसांवरून वीस दिवसांवर आणण्याचे 'टार्गेट' देण्यात आलं आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना १७ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 


या अधिकाऱ्यांना दररोज आपल्या झोनमध्ये २ वाजे पर्यंत जाऊन भेट द्यायची आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे.