मुंबई : Mumbai Accident News : मुंबई शहरात ( Mumbai) वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे काय होऊ शकते, याची कल्पना तुम्ही करु शकणार नाही. मुंबईतील हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील. घाटकोपर येथील सुधा पार्क परिसरात झाल्या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Mumbai Accident ) ओला चालकाच्या मित्रामुळे हा अपघात झाला आहे. ( Mumbai Ghatkopar Accident )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल चार्जिंगच्या (mobile charging) नादात ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दिलयाने हा मोठा अपघाच झाला. यात ओला चालकाच्या मित्राने आठ जणांना उडवले आहे. तर तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये एका विध्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर तात्काळ स्थानिक रहिवाशांनी जखमींना राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले. या दुर्घटनेची दृश्य सीसीटीव्हीत चित्रीत झाली असून याप्रकरणी पोलिसांनी ओला चालकासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. राजू यादव (42) असे आरोपीचे नाव आहे. त्याला बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या आणि गंभीर दुखापत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात करणारा हा टुरिस्ट कार चालकाचा मित्र आहे. ड्रायव्हर जवळच चहा घेत असताना यादव मोबाईल चार्ज करण्यासाठी गाडीत बसला. त्याने आपला फोन चार्ज करण्यासाठी कारचे इंजिन सुरू केले आणि चुकून अ‍ॅक्सिलेटरवर पाऊल ठेवल्याने वाहन थेट दुसऱ्या गाड्यांवर धडकले. दृश्यानुसार, रिक्षाच्या पाठीमागून जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्याला धडक दिली आणि चालकाला कार थांबवता न आल्याने ती 50 मीटर वेगाने गेली आणि येथील  जंक्शनवर आणखी दोन रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडकली, त्यात सात जण जखमी झालेत.


कमजोर हृदयाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये !