Mumbai Crime: पत्नीकडून घटस्फोट मिळत नसल्याने पतीची सटकली; प्रेसयीच्या मदतीनं केला Acid Attack
Crime News : धक्कादायक बाब म्हणजे 17 वेळा तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही असा दावा पीडित महिलेना केला आहे.गुरुवारी याप्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यापासीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे
Mumbai Crime News : पहिल्या पत्नीकडून घटस्फोट (divorce) मिळत नसल्याने पतीने दुसऱ्या पत्नीसह तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत (Mumbai News) घडला आहे. मुंबईच्या मालाडमध्ये (Malad) हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. पतीने प्रेयसीसह मिळून पत्नीला फिनाईल पाजत तिच्यावर अॅसिड हल्ला (acid attack) केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसीसोबत लग्न केल्यानंतर प्रियकराने मिळून पत्नीवर हल्ला केला. पत्नीने पोलिसांत यासंदर्भात तक्रार केली आहे. पत्नीने आरोप केला की कुरार पोलिसांनी (kurar police) एका महिन्याहून अधिक काळ उच्चपदस्थांपर्यंत पोहोचेपर्यंत गुन्हा नोंदवला नाही. दरम्यान, आरोपी अजूनही फरार आहेत.
मालाडमध्ये एका 34 वर्षीय महिलेने तिचा विभक्त पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध फिनाईल सेवन करण्यास भाग पाडले आणि तिच्यावर अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटस्फोट देत नसल्यामुळे पतीने व प्रेयसीने हा प्रकार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. पीडित पत्नीने सांगितले की, ती 10 टक्के भाजली आहे. पत्नीने यावेळी कुरार पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.
काही दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्यामुळे पत्नी आपल्या माहेरी जाऊन राहत होती. याचाच फायदा घेत पतीने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करून प्रेयसीला घरी आणल्यानंतर पतीने पहिल्या पत्नीकडून घटस्फोटाची मागणी केली होती. यासाठी त्याने जबरदस्ती केल्याचेही पत्नीने म्हटलं. मात्र पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला. यानंतर पती आणि दुसऱ्या पत्नीने फिनाईल पाजत अॅसिड हल्ला केला, असा दावा पहिल्या पत्नीने केला आहे. या सगळ्या संदर्भात कुरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेलरिंगचे काम करणाऱ्या पीडितेने 2017 मध्ये एका दुकान मालकाशी लग्न केले होते. लग्नानंतर पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. एप्रिल 2022 मध्ये, पीडिता तिच्या पालकांच्या घरी परतली. पीडितेने 17 अदखलपात्र तक्रारी दाखल केल्यानंतर कोणतीही दाद न मिळाल्याने प्रादेशिक अतिरिक्त आयुक्त कार्यालय गाठले. यानंतर पोलिसांनी 5 जानेवारी रोजी गुन्हा नोंदवला आहे.