मुंबई विमानतळावरही `मेगा ब्लॉक`, विमान सेवेवर परिणाम
मुंबई विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत केले जाणार आहे.
मुंबई : विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस केले जाणार आहे. या दिवसांमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण, तसेच लँडिंग होणार नाही. २१ मार्चनंतर मात्र वाहतूक पूर्ववत होणार आहे.
रेल्वेपाठोपाठ आता मुंबई विमानतळावरही प्रवाशांना 'मेगा ब्लॉक'चा सामना करावा लागणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस सहा तासांसाठी मुंबई विमानतळावरील रनवे दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येणाराय. त्यामुळं सकाळी ११ ते ५ या वेळेत एकही विमान उडू शकणार नाही किंवा उतरू शकणार नाही. येत्या ३० मार्चपर्यंत हे दुरुस्तीचं काम सुरू राहणार आहे. त्यामुळं विमान तिकिटांचे दर तब्बल ३० टक्क्यांनी महागणार आहे.