मुंबई : मुंबै बँकेनं नियम धाब्यावर बसवून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोट्यात असलेल्या अहमदनगरच्या साखर कारखान्याला 35 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचा आरोप मुंबै बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ यांनी केलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुबंई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही खेळी खेळल्याचा आरोपही शिवसेनेच्या अभिजीत अडसूळ यांनी केलाय. कारखान्याचे नेटवर्थ निगेटीव्ह म्हणजे तोट्यात असतानाही नियम धाब्यावर बसवून कर्ज मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केलाय. 


याबाबत आरबीआय आणि नाबार्डकडे मुंबै बँकेविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती संचालक अभिजीत अडसूळ यांनी दिलीय. याबाबत मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी नियमानुसार कर्ज वाटप केल्याचा दावा केलाय.