मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजेच एसटीच्या पाठोपाठ आता बेस्ट कर्मचार्‍यांनीही संपाचा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्टमध्ये रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी वडाळा डेपोमध्ये धरणं आंदोलन करायला सुरूवात केली आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना बोनस जाहीर झाला आहे मात्र बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस मिळणार की नाही याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. 


मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ आंदोलनाच्या तयारी आहेत. 


काय आहे मागणी ? 
 बेस्ट उपक्रमाने रोजंदारी कामगारांना किमान वेतन १५,३०९ रूपये द्यावे 
 २४० दिवसांपेक्षा अधिक काम करणार्‍यांना सेवेत कायम करावे. 
 
 या मागण्या मान्य न केल्यास ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट कामगार संपावर जाणार आहेत. भाऊबीजेच्या दिवशी संप करण्याचा इशारा दिला कर्मचार्‍यांनी दिला आहे.