Kishori Pednekar : आताची मोठी बातमी. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना मोठा धक्का बसला आहे. किशोरी पेडणेकर यांचं मुंबईतल्या गोमाता नगरमधील (Gomata Nagar) घर आणि कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) कारवाई करण्यात आली आहे. गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय मुंबई मनपाने ताब्यात घेतलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 'किशोरी पेडणेकर को हिसाब देना पडा' असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या यांनी काय केले होते आरोप?
वरळी गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पातील 6 गाळे किशोरी पेडणेकर यांनी हडपल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. पेडणेकर यांनी घुसखोरी करुन घराचा ताबा घेतला, दोन वर्षांपूर्वी याची तक्रार केली होती, पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, तसंच त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.



किशोरी पेडणेकर यांचं उत्तर
भाजप नेते किरिट सोसय्या यांनी केलेल्या ट्विटला किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करुन उत्तर दिलं आहे. #भाडेतत्त्वावर राहत होते ,माझे कुठचेही गाळे नव्हते व कोणतेही गाळे माझे सील झालेले नाही हे माहिती असून सुद्धा किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवर जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केलेला आहे गोमातातील जनता हे ओळखून आहे. त्या गरीब नागरिकांची न्यायालयीन लढाई अजून बाकी आहे. असं किशोरी पेडणेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



'सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न'
यावर काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. पण शिंदे आणि फडणवीस हे त्या दबावाला बळी पडणार नाहीत, ही माझी अपेक्षा आहे. किरीट सोमय्या यांची कार्यपद्धती सर्वांना माहिती झाली आहे. किरीट सोमय्या आरोप करतात, मग ती व्यक्ती भाजपमध्ये गेल्यावर ते थांबतात. पण मी कायद्याची लढाई लढेन, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटल होतं.