Mumbai News : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, लिफ्टमध्ये (Lift) अडकून एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. नगीना अशोक मिश्रा (Nagina Ashok Mishra) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर घटना गोराई चारकोपमधील (Gorai Charkop) हायलँड ब्रिज इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे लिफ्टमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील (Mumbai Breaking) चारकोप परिसरातील हायलँड ब्रिज या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी 62 वर्षीय महिला 21 ऑक्टोबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी लिफ्टने खाली चालल्या होत्या. त्यावेळी लिफ्ट (Lift) अचानक तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्यभागी अडकली. यामुळे घाबरून महिलेने आपल्या मुलाला आवाज दिला असता मुलगा पळत पळत आला. त्याने लिफ्टचा (Lift) दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र लिफ्टचा दरवाजा उघडत असताना त्या मुलाला विजेचा शॉक (Shock) लागला. त्याक्षणी त्याने त्वरित पळत जाऊन विद्युत पुरवठा बंद केला. 


विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर इमारतीच्या गेटवरील सिक्युरिटी गार्डला (Security guard) सोबत घेऊन लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता लिफ्ट अति वेगाने तळमजल्यावर जाऊन आदळली. लिफ्ट आदळल्यामुळे तळ भागाला दोन मोठे होल पडले. या दुर्घटनेत त्या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली. यानंतर जखमी अवस्थेत महिलेला सोसायटीतील रहिवाशांनी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले. 


वाचा : Rohit Sharma पर्थमध्ये इतिहास रचणार, ख्रिस गेलचा हा विक्रम मोडणार का? 


लिफ्ट अपघाताच्या घटना वाढल्या


दरम्यान, मागील दोन महिन्यातील लिफ्टच्या अपघातामुळे मृत्यू होऊन तीन व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. मालाड चिंचोली बंदर परिसरात 17 सप्टेंबर रोजी २६ वर्षीय शिक्षिकेला लिफ्टच्या अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. तर कांदिवली परिसरात 70 वर्षीय नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आता 21 ऑक्टोबर रोजी नागिना मिश्रा या महिलेला लिफ्ट अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.