Mumbai Toll Plaza : MH 04 च्या गाड्यांना अर्थात ठाण्याच्या गाड्यांना टोल माफ (Toll Free) करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं मोठं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिलंय.  15 दिवस टोलनाक्यावर MSRDC कडून टोलवर व्हिडीओग्राफी केली जाणार त्यात MH 04 च्या गाड्या किती येतजात आहेत यांचा आढावा घेणार त्यानंतर अहवाल सादर केला जाईल. तसंच वाशी टोलनाक्यासह इतर टोलनाक्यांवर सोयीसुविधांसाठी लवकरच एक समिती गठीत केली जाणार आहे..  मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये टोलमुक्तीसंदर्भात चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग टोल हवा कशाला?
मुख्यमंत्री, त्यांचे अधिकारी आणि संबधित मंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली. या चर्चेनंतर त्याच्या निर्णयाप्रत येणं यासाठी उद्या सकाळी शिवतीर्थावर बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याची माहिती पत्रकार परिषदेत देईल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज्यातील टोलच्या मुद्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यात टोलच्या मुद्द्यार चर्चा झाली.


टोलनाक्यावर असुविधा
या बैठकीत राज ठाकरे यांनी टोलनाक्यावर असलेल्या असुविधांचा मुद्दाही उपस्थित केला. मुंबई entry point रस्ते ही नीट नाहीत,  येल्लो line चा नियम पाळला जात नाही, महिला टॉयलेट सुद्धा नाही,  आम्ही  सगळे tax  देतो  मग  टोल  कशाला असे मुद्दे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. या बैठकीत टोलनाक्याशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते. टोल नाक्यावरच्या असुविधांच्या मुद्दयावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांना झापल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महिला शौचालय ॲम्बुलन्स सेवा, पोलीस बंदोबस्त पिवळा पट्टीचा विषय अशा  विषयावर गंभीर चर्चा झाली तसंच टोलमुक्त टोल दरवाढी संदर्भात देखील येत्या काही काळात लवकर लवकर निर्णय देण्याचे देखील या ठिकाणी चर्चा झाल्याची माहिती आहे. 


राज ठाकरे यांनी दिला होता इशारा
देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओचा दाखला देत राज्यात फोर व्हिलर, टू व्हिलरला टोल नसेल तरीही वसुली झाल्यास टोल नाके जाळून टाकू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. टोल हा राज्यातला सर्वात मोठा स्कॅम आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. राज्यात केवळ व्यावसायिक वाहनांना टोल असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली होती. हे जर खरं असेल तर कारकडून टोल वसुली करू देणार नाही, नाहीतर टोलनाके जाळू असा इशारा राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.


पोलिसांसाठी खुशखबर
दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  पूर्ण राज्य भारतील पोलिसांना हक्काची घरं मिळणार आहेत.  पोलिसांना 15 हजार घरं देण्याची मागणी राज ठाकरेंनी केली होती. यावर बिल्डरने जास्तीचा एफएसआय देऊन 15 हजार देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे