मुंबई : मध्य रेल्वेसेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल
डाऊनला जाणारी धिम्या ट्रॅकवरील वाहतूक ठप्प असली तरी, जलद मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. धिम्या मार्गावरील वाहतूकही सध्या जलद मार्गावरून सुरू आहे.
मुंबई: मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आसनगाव लोकल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची डाउन दिशेची लोकल वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमाण्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
तांत्रिक वाहतूक बंद झाल्याची प्राथमिक माहिती
कोपर येथे 3 नंबर फास्ट डाउन ट्रॅक वर आसनगाव लोकल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे डाउन दिशेची लोकल वाहतूक बंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाड दूर करून वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशानस कामाला लागले आहे. दरम्यान, हा बिघाड दूरूस्थ होऊन रेल्वे नेमकी कधी धावू लागेल याबाबत मात्र काहीच माहिती नाही.
धिम्या मार्गावरील वाहतूकही सध्या जलद मार्गावरून सुरू
महत्त्वाचे असे की, डाऊनला जाणारी धिम्या ट्रॅकवरील वाहतूक ठप्प असली तरी, जलद मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. धिम्या मार्गावरील वाहतूकही सध्या जलद मार्गावरून सुरू आहे.