मुंबई: पैसे नव्हे, कपडे चोरणारा चोर, पोलीस मागावर
या चोराने आतापर्यंत अनेक घरे आणि दुकानांतून मौल्यवान कपड्यांची चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. या कपड्यांच्या किमती काही हजारांपासून काही लाखांपर्यंत असल्याचेही सांगितले जाते.
मुंबई: शहरातील कांदिवली पोलीस एका अजब चोराच्या मागावर आहेत. या चोराचे वैशिष्ट्य असे की, हा चोर दागीणे, पेसे, मौल्यवान वस्तू चोरत नाही. तर, हा चोर फक्त कपडे (पॅन्ट-शर्ट) चोरतो. या चोराने आतापर्यंत अनेक घरे आणि दुकानांतून मौल्यवान कपड्यांची चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. या कपड्यांच्या किमती काही हजारांपासून काही लाखांपर्यंत असल्याचेही सांगितले जाते.
पोलिसांत कपडे चोरीचा गुन्हा दाखल
प्राप्त माहितीनसुार, कांदिवलीतील एसव्ही रोडवरील ज्ञानदर्शन बिल्डिंगमध्ये राहणारे कपडे व्यापारी कुणाल सोमनी यांनी पोलिसांत चोरीची तक्रार केली आहे. कुणाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, चोराने त्यांच्या दुकानातून १०० शर्ट्स, १५० जिन्स पॅन्ट्स आणि सुमारे ४० टी-शर्ट्स लंपास केले आहेत. चोराने येथील दुकान क्रमांक २,३,४ आणि ५ मध्ये चोरी केली.
सीसीटीव्ही यंत्रणा गायब
हा अजब चोर आणि चोरीच्या घटनेमुळे परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे. ही चोरी चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या तपास पथकाने दुकानात तपासणी केली. सीसीटीव्हीही तपासायचा प्रयत्न केला. पण, दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणाही चोरट्यांनी गायब केल्याचे पुढे आले. चौरी करताना सीसीटीव्हीत पुरावा सापडू नये यासाठी चोरट्याने ही खबरदारी घेतली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी भा.दं.सं. ४५७ ाणि ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पैशांऐवजी कपड्यांच्या प्रेमात
दरम्यान, विशेष असे की, चोरी घडली तेव्हा दुकानात काही हजार रुपये होते. मात्र, चोरट्याने पशांकडे ढूंकुणही पाहिले नाही. त्याने या पैशांतील केवळ २०० रूपये चोरून नेले. मात्र, दुकानातील कपड्यांवर मात्र त्याने भलताच हात मारला. चोरीचा प्रकार बघून पोलिसांना संशय आहे की, हा चोर केवळ कपडेच चोरत असावा. या कपडे चोराला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशिल आहेत.