मुंबई : मुंबईत मरोळ इथं पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. त्याआधी त्यांनी पोलीस स्थापना दिवसाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन मरोळ इथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संचलनाचं निरीक्षण केलं. त्यानंतर सशस्त्र प्रात्यक्षिकं साजर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी २ जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ५८ वर्षांपूर्वी म्हणजे २ जानेवारी १९६१ ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना विशेष दर्जा प्राप्त झाला... तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो.



पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानाचा भूमिपूजन सोहळा ही यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.