नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडको भागातली २४ एकर जमीनीचा एक तुकडा कवडीमोल भावानं बिल्डरच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलायं. सिडकोमध्ये असणारी सोळाशे कोटी रुपये किंमतीची जमीन बिल्डरला अवघ्या ३ कोटी रुपयात हस्तांतरित करण्यात आली. मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याशिवाय असा प्रकार शक्यच नाही असं आज संजय निरुपम यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख रणदीप सुरजेवाल आणि माजी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.