Mumbai Corona News : कोरोनानं (Corona Cases) जगाची पाठ सोडली नसली तरीही मुंबई आणि महाराष्ट्रात (Maharashtra News) मात्र कोरोना बऱ्याच अंशी अटोक्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण, खरंच असं आहे का? कारण, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामध्ये (Mumbai) मुंबईत नव्यानं सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. परिणामी आता शहरात H3N2 मागोमागच कोरोनाही पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात रविवारी कोरोनाचे 46 नवे रुग्ण सापडले. रविवारी सक्रिय रुग्णांचा आकडा होता 258. ज्यामध्ये 74 रुग्ण मुंबईतील होते असं सांगण्यात आलं. थोडक्यात सध्या महाराष्ट्रात खोकला, तापाचे रूग्ण वाढत असताना, कोरोना रूग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. 


H3N2 Influenza ची लक्षण तुम्हालाही जाणवतायत का? 


हवामानात होणारे बदल आणि सातत्यानं वाढणारं प्रदूषण पाहता, भारतामध्ये सर्दी खोकला अशा तक्रारी असणारे H3N2 Influenza चे रुग्ण वाढत असल्याची बाब अखेर आयसीएमआरनं नजरेत घेतली. कोरोनासारखीच लक्षणं असल्यामुळं हा संसर्ग अनेकांच्या आरोग्यावर परिणाम करताना दिसत आहे. श्वसनक्रियेमध्ये यामुळं काही अडचणी उदभवताना दिसत आहेत. 


हेसुद्धा वाचा : Smoking Side Effects: एक सिगारेट ओढल्याने तो मुका झाला! त्याची परिस्थिती पाहून डॉक्टरही चक्रावले


H3N2 Influenza च्या लक्षणांमध्ये खोकला, अस्वस्थ वाटणं, मळमळणं किंवा उलट्या होणं, घसा खवखवणं, अंगदुखी, तापाचा समावेश आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी म्हणून काही प्राथमिक गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. यामध्ये मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, हात स्वच्छ धुणं याबाबतची काळजी घेतली जाणं अपेक्षित आहे. शिवाय शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पाण्याचा अंश असणारे पदार्थ, फळं खावीत, भरपूर पाणी प्यावं असा सल्ला आरोग्य यंत्रणा सध्या नागरिकांना देत आहेत. 


सदरील परिस्थितीमध्ये साधारण आठवडाभ ही लक्षणं दिसून येतील. यातही न घाबरता डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांच्या सांगण्यावरूनच औषधं घेण्याचा सल्ला आयसीएमआरनं दिला आहे. तर, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याचं आवाहनही केलं आहे.