Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा हाहाकार
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकड्यात (Mumbai Corona Update) झपाट्याने वाढ होतेय.
मुंबई : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकड्यात (Mumbai Corona Update) झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे पालिका प्रशासानच्या चिंतेत वाढ झाली आहे. (mumbai corona update 8 june 2022 today 1 thousand 765 patients found in city)
मुंबईत आज (8 जून) रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केलाय. मुंबईत 1 हजार 765 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 2701 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालल्यामुळे चौथी लाट येणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहेत. तसंच नवे निर्बंधांनाही सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
मास्क वापरण्याचं आवाहन
राज्यात सध्या कोणतेच निर्बंध नाहीत. तसेच मास्कसक्तीही नाही. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने मास्क वापरण्याबाबत वारंवार आवाहन केलं जात आहे.
राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी
बुधवार 8 जून : 2 हजार 701
मंगळवार 7 जून : 1 हजार 881
सोमवार 6 जून : 1 हजार 36
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून : 1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
गुरुवार 2 जून : 1 हजार 45
बुधवार 1 जून : 1 हजार 81