मुंबई : शहरात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा (Mumbai Corona) विस्फोट होताना दिसतोय. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मुंबईच्या कोरोना रुग्णंसंख्येत गेल्या 20 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही (Dharavi Corona Update) कोरोना वाढला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल  2 हजार 510 रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या (BMC) चिंतेत वाढ झाली आहे. (mumbai corona update today 29 december 2021 in mumbai found 2 thousand 510 patients found patients increasing dharavi) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 24 तासात 251 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 7 लाख 48 हजार 788 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.   



मुंबईतील बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. तर सध्या सक्रिय रुग्ण हे एकूण 8 हजार 60 इतके आहेत. 


धारावीतील कोरोना 


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धारावी हा भाग कोरोना हॉटस्पॉट ठरला होता. याच भागातही आता कोरोनाचे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.  


धारावीत काही दिवसांपूर्वी शून्यावर असलेला रुग्णांचा आकडा हा आता थेट 17 वर जाऊन पोहचला आहे. धारावीत सध्या कोरोनाचे एकूण 43 रुग्ण आहेत.