कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: एकीकडे मुंबई उपनगरांमध्ये कोरोना व्हायरसचा Coroanavirus प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील रुग्णवाढीची टक्केवारी मात्र कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतील रुग्णवाढीची टक्केवारी आता १.९६ टक्के इतकी झाली आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही (डबलिंग रेट) ३६ दिवसांपर्यंत वाढला आहे.मुंबईच्या एच पूर्व विभागात तर कोरोनाचा डबलिंग रेट ७६ दिवसांपर्यंत वाढला आहे. तर रुग्णवाढीचा सरासरी दर एक टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी  ६० दिवसांपेक्षा जास्त असलेले विभाग 
 ई- 67, एफ / उत्तर ६५ 
एम /पूर्व ६१  
एल ६०


रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षा जास्त असलेले 3 विभाग . 
ए 57, जी /दक्षिण ५१  
बी ५०


रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४० दिवसांपेक्षा जास्त असलेले विभाग
जी/ उत्तर ४८
एम /पश्चिम ४७
एन ४३


एस वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
मुंबईतील भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवई या परिसराचा समावेश असलेल्या एस वॉर्डमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात एस वॉर्डमध्ये जवळपास ६०० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. या वॉर्डमधील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे झोपडपट्टी भागातील असले तरही पवईतील उच्चभ्रू वस्तीतही कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. 

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला एस वॉर्ड सर्वाधिक कमी रूग्ण असणाऱ्या यादीत होता. पण जून महिन्यात या वॉर्डमध्ये झपाट्याने रूग्णसंख्या वाढली आहे. १ जूनला एस वॉर्डमध्ये १७०५ कोरोनाग्रस्त होते तर १६ जूनला अवघ्या पंधरवड्यात रूग्णांची वाढ झपाट्याने झाली आणि हा आकडा ३१६६ वर पोहोचली आहे.