गलती से मिस्टेक... बाईने केला गंभीर आरोप; ब्लूटूथ डिवाइसमुळे जेल मध्ये जाता जाता वाचला
Bluetooth Device : ब्लूटूथ डिवाइसमुळे एका तरुणाला जेलवारी घडली असती. मात्र कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तताा केली आहे
Crime News : आजकाल स्मार्टफोन आणि ब्लूटूथ डिवाइस हे समीकरण आता सगळीकडेच पाहायला मिळतंय. स्मार्टफोनच्या वापरावशिवाय आपण ब्लूटूथद्वारे (Bluetooth) थेट संवाद साधू शकतो. पण कधी कधी हे ब्लूटूथ डिवाइस अडचणीतही आणू शकतं. असाच काहीसा प्रकार मुंबईत (Mumbai Crime News) घडलाय. हे प्रकरण थेट कोर्टात गेलं होतं. मुंबईच्या एका 32 वर्षीय व्यावसायिकाला एका मुलीच्या पाठलाग करण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
महिन्याभरापासून पाठलाग
सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या 32 वर्षीय व्यावसायिकावर एका तरुणीने महिन्याभरापासून पाठलाग करत माझ्या कानात गुड मॉर्निंग बोलत असल्याचा आरोप केला होता. आता न्यायाधिशांनी व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता केली आहे. ब्लूटूथ डिवाइसवर बोलताना रस्त्याने चालत असताना कोणालाही गैरसमज होऊ शकतो असे कोर्टाने म्हटलयं.
...तर घरापर्यंत पाठलग केला असता
2019 मध्ये तरुणीने रोज सकाळी ऑफिसला जाताना एक व्यक्ती पाठलाग करत कानात गुड मॉर्निंग म्हणत असल्याचा आरोप केला होता. यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला होता. "जर पाठलाग करुन माहिती काढायची होती तर संध्याकाळी ऑफिसवरुन येतानाही असेच केले असते. तसेच तिच्या घरापर्यंत पाठलाग केला असता. पण त्याने तसे काही केले नाही," असे आरोपीच्या वकिलांनी म्हटले.
वकिलांनी सांगितले की, "हा निव्वळ योगायोग होता की दोघेही रोज एकाच वेळी ऑफिसला जायचे आणि व्यावसायिक त्याच्या ऑफिसमधील लोकांशी ब्लूटूथ डिव्हाइसवर बोलत असे आणि अनेकदा त्यांना ब्लूटूथवर गुड मॉर्निंगच्या म्हणत असे."
ब्लूटूथवर बोलताना अनेकांचा गैरसमज
महानगर दंडाधिकारी यशश्री मारुलकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. "ब्लूटूथ डिवाइसवर रस्त्याने बोलत जाताना अनेकांचा गैरसमज होतो. जर आरोपीचा हेतू पाठलाग करणे होता तर संध्याकाळी ऑफिसमधून येतानाही पाठलाग केला असता. सकाळी फुटपाथवर कोणाचा पाठलाग करणे शक्य नाही," असे जयश्री मारुलकर यांनी म्हटले.
दरम्यान, जर हा आरोप सिद्ध झाला असता तर व्यावसायिकाला भादवि नुसार तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.