Crime News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 83 वर्षीय बिझनेसमनला (Businessman) अश्लिल साईट बघणं चांगलंच महागात पडलं आहे. या बिझनेसमनची फसवणूक (Fraud) करण्यात आली असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्तीचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. या बिझनेसमनने एक अश्लील वेबसाईट उघडली होती. यावेळी त्यांची फसवणूक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
या साईटवर काही व्हिडिओ (Video) बघत असताना कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर (Computer Screen) एक मेसेज आला आणि त्यानंतर कॉम्प्यूटर ब्लॉक झाला. मेसेजमध्ये पोलिसांच्या चिन्हासह (Police Monogram) इशारा देण्यात आला होता. 24 तासात 32 हजार रुपये भरले नाहीत तर अटक होऊ शकते. त्यामुळे बिझनेसमन घाबरला आणि त्याने मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करत तात्काळ 32 हजार रुपये पाठवले. 


अशी झाली फसवणूक
बँकेत स्टेटमेंट तपासत असताना या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. कारण पैसे पोलिसांच्या अकाऊंटला नाही तर भलत्याच अकाटंला ट्रान्सफर झाले होते. MERD / PAYU GURGAON / 3786 या नावाच्या अकाऊंटवर हे पैसे जमा झाले. यानंतर त्या बिझनेसमनने पोलिसात तक्रार दाखल केली.


मेसेजमध्ये काय लिहिलि होतं?
त्या बिझनेसमनने दिलेल्या माहितीनुसार वेबसाईट बघत असताना कॉम्प्यूटर स्क्रिनवर एक पोलिसांच्या चिन्हासह एक मेसेज आला. त्यात लिहिलं होतं, 'अश्लिल व्हिडिओ बघणं गुन्हा आहे, यासाठी 5 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. एका दिवसात 32 हजार रुपये भरले नाहीत तर तुम्हाला अटक होऊ शकते'. मेसेज बघताच त्या व्यक्तीने तात्काळ 32 हजार रुपये दिलेल्या अकाऊंटला ट्रान्सफर केले.