Crime News: तुम्हीही मित्रांसोबत `गटारी`चं नियोजन करताय? त्याआधी बातमी वाचाच!
Illegal bogus liquor: बनावट दारूची विक्री होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाया हाती घेतल्या आहेत. त्यात काही ठिकाणी बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.
Mumbai Crime News: श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या सोमवती अमावास्येनिमित्त (Somvati Amavasya) शहरात दारू खरेदी- विक्री सुरू आहे. अशात बनावट दारूची विक्री होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाया हाती घेतल्या आहेत. त्यात काही ठिकाणी बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात संशयित दोन जणांवर गुन्हे करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी, हलक्या प्रतीची दारू महागड्या दारूच्या बाटलींमध्ये टाकून, सीलबंद केली दारूच्या बाटल्यांची बाजारात विक्री करण्यासाठी जात असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन जणांना अटक केली होती. तर पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ बनावट बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. अशातच आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
जप्त केलेल्या दारूचे काय होतं?
जप्त केलेल्या दारूचे गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयात सुनावणीपर्यंत साठा सरकारकडे सील केला जातो.
11 लाखाचा मुद्देमाल जप्त
मुंबईच्या कारवाईत बनावट स्कॉच्या बाटल्या, कागद, वापरण्यात येणारे पुठ्ठे, दोन मोबाइल आणि एक लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर आठवडाभरात मुंबई विभागाने धारावी येथे कारवाई करून लाखोंची दारू आणि एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
देशी किती, विदेशी किती?
उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी दारू, तसेच काही विदेशी बनावट दारू जप्त केल्या जातात.
आणखी वाचा - पुण्यात गणेशोत्सव काळात 'या' दिवसात दारू विक्रीला बंदी
दरम्यान, शेजारच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट बेकायदेशीर दारूवर कारवाई करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. यातील संपूर्ण दारू बनावट आहे. हे बनावट दारू विक्रीचे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या रॅकेटच्या मुळाशी जाऊन तपास करण्यात येईल, असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं होतं.