Mumbai Cyber Crime News: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅट फॉर्मवर उपलब्ध असलेली जमतारा (Jamtara - Sabka Number Ayega) ही वेबसिरीज चांगलीच चर्चेत राहिली. सायबर गुन्हेगारीवर (Cyber crime) भाष्य करणाऱ्या या सिरीजमुळे अनेकांचे डोळे उघडले आहेत. अशातच आता 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील (Mumbai News) माटुंगा पोलीस स्टेशनच्या (Matunga Police Station) हद्दीमध्ये राहणारे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 1,10,000 रुपयांना गंडा घातलाय. (Mumbai Cyber Crime News phone call from bank under KYC name then be careful your bank money may disappear)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीएफसी बँकेचा KYC करायची आहे, असं सांगून कॉल (fraud call) केला आणि वृद्धाची फसवणूक झाली. मेसेज पाठवून द्या लिंक ओपन करून फॉर्म भरण्यासाठी सांगण्यात आलं. ओटीपी (OTP)  नंबर येईल तो ओटीपी नंबर द्या असं सांगून या ओटीपीच्या माध्यमातून बँकेतील 1,10,000 रुपयाचे रक्कम काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी (Police investigation) सुरू केली.


पोलिसांनी तपास करून यामध्ये तीन आरोपींना अटक (Arrested) केली. हे सर्व आरोपी झारखंड (Jharkhand) मधून हा सगळा व्यवहार करत असल्याचा पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत तीन मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे दहा ते बारा सिम कार्ड (Sim Card) जप्त करण्यात आले. आरोपीने अशाच पद्धतीचे महाराष्ट्र, कर्नाटक, हैदराबाद अशा विविध ठिकाणी 10 पेक्षा जास्त गुन्हे उघड झाले आहेत.


आणखी वाचा - अहमदनगर हादरलं! वर्षभरापूर्वीच नोकरी मिळाली आणि... महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कामावरुन परतातच उचललं टोकाचं पाऊल


दरम्यान, पोलीस निरीक्षक सुभाष शिनगोर यांनी याविषयी माहिती दिली. आरोपीने वापरलेल्या मोबाईल क्रमांकांचा CDR/SDR/Location शोधण्यात पोलिसांना यश आलं. दिल्ली येथील एका स्टोअरमधून मोबाईल खरेदी करताना पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. CCTV Footage जप्त करण्यात आलं. त्यानंतर सैफ अली उस्मान अली,  सोहराब अन्सारी आणि अरूणकुमार मंडळ या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना दिल्लीत तर एकाला झारखंड येथून अटक करण्यात आली आहे.