मुंबई : ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि शहरातील रूग्णालयात बेडच्या उपलब्धता करण्यासाठी मुंबईतील दाऊद बोहरा समाजाने भेंडी बाजार येथे कोविड -19 वॅार रुम तयार केली आहे. शहरातील बोहरा समाजाचे कारभार सांभाळणाऱ्या अंजुमने शियातेली या संस्थेने दाऊद बोहरा यांच्या उपक्रमाच्या प्रोजेक्ट राईजच्या छताखाली वॅर रुमची स्थापना केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॅर रुम सध्या 60 सदस्यांच्या टीमद्वारे सांभाळली जाते, ज्यात मल्टी-स्पेशलिटी डॉक्टर, समाजसेवा स्वयंसेवक आणि स्थानिक अधिकारी यांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक एसओपी डॉक्युमेंट तयार केले गेले आहे, जेणेकरून प्रत्येक घटनेची वास्तविक स्थिती लक्षात घेऊन रुग्णांची काळजी घेतली जाते.


वैद्यकीय सहाय्यता व्यतिरिक्त, वॅार रुममधील सदस्य मृत व्यक्तीच्या कुटुंबास अंत्याविधी करण्यासाठी मदत करतात. या वॉर रूमव्यतिरिक्त, दाऊदी बोहरा समाजाची सेफी अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देखील कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत देतात. आता सेफी अ‍ॅम्ब्युलन्स विभागाने बीएमसी सी वॅार्ड कार्यालयाच्या मदतीने लोकांना लसी देण्यास सुरुवात केली आहे.



सध्या मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या फारच कमी झाली आहे. शनिवारी राज्यात 82 हजाराहून अधिक लोकं कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. तर 53 हजार 605 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ही संख्या फारच कमी झाली आहे आणि मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे.