सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई :  राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती जिल्हा बँक निवडणुकांची (Distrcit Bank Election). सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (sindhudurga district bank election) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) नेते एकत्र आल्याचे पहायला मिळाले. मात्र तरी देखील राणेंनी या जिल्हा बँकेवर आपला दबदबा कायम ठेवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसोबत चर्चेत राहिलेली आणखी एक जिल्हा बँक ती म्हणजे मुंबई जिल्हा बँक (Mumbai District Co-operative Bank). निवडणुकीच्या आधीपासूनच चर्चेत असलेल्या या जिल्हा बँकेवर सर्व पक्ष एकत्र आले खरे पण चार अपक्ष उमेदवारांनी मात्र या निवडणुकीत खरी रंगत आणली. मुंबई जिल्हा बँकेवर वर्चस्व असलेल्या प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी 17 जागा बिनविरोध निवडून आणल्या खऱ्या मात्र उरलेल्या चार जागांवर त्यांना मतदान घेण्यास भाग पाडलं. 


जिल्हा बँकेच्या सर्वच्या सर्व जागा जरी निवडुन आणण्यात दरेकरांना यश आले असले तरी 4 जागांमुळे त्यांची डोकेदुखी वाढली होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला असून, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलचे (Sahakar Panel) 21 पैकी 21 उमेदवार विजयी झाले.


चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना 18 तर सुखदेव चौगुले यांना 16 मते मिळाली.  पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना 131 मते पडली. तर कमलाकर नाईक यांना अवघी 59 मते मिळाली. जयश्री पांचाळ यांना 332 मतं तर, शालिनी गायकवाड यांना 188 मतं मिळालीत. तर अनिल गजरे हे 4 हजार मते घेऊन विजयी झाले. तर यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली.