मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood Actor Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मिळणार की नाही? हे उद्याच स्पष्ट होणार आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या सत्र न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे. गेल्या सुनावणीत कोर्टानं दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान जेलमध्ये आहे. त्यातील 12 दिवस त्याला मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये राहावं लागलं. आता उद्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्ट काय निर्णय देतं याकडेच सर्वांचं लक्ष असेल. 


उद्या कोर्टात काय होऊ शकतं


जामीन मंजूर झाल्यास कागदोपत्री कारवाईनंतर आर्यन खानची सुटका होऊ शकते. मात्र, अर्ज नामंजूर झाल्यास आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. जामीन नाकारल्यास आर्यन खानचे वकील हायकोर्टात जाऊ शकतात.


आर्यन खानसोबत अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही उद्याच सुनावणी होणार आहे. मुंबईत समुद्रात क्रुझवर ड्रग्स पार्टी करणाऱ्या आर्यन खानसह आठ जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खानला सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात (Arthar Road Jail) आहे.