मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर नंबर टाकण्यात आल्याने प्रशासनावर टीका होत आहे. दरम्यान दोन इसमांनी केईएमच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन डॉक्टरांना मारहाण केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 शनिवारी सायंकाळी शिवसेनेचे दोन कार्यकर्ते केईएम हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक  विभागात आले व मृतांच्या चेहऱ्यावर टाकलेल्या आकड्यांबद्दल जाब विचारू लागले. ते दोघेही डॉ. हरी पाठक यांच्या केबिनमध्ये घुसले आणि त्यांना मारहाण केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आरोपींच्या पाच सहकार्यांना शोध सुरू आहे. ते म्हणाले, "आम्ही शिवसेना सदस्यत्व ओळखपत्र आरोपींकडून जप्त केले आहे." दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम ३५३, ३२३,१४३, १४५ आणि १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.