मुंबई : कमला मिल दुर्घटनेनंतर जागी झालेल्या मुंबई महानगरपालिकेनं आपल्या हद्दीतल्या सर्व २४ विभागांमध्ये, दिवसभरात ३१४ ठिकाणी कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तपासणी दरम्यान आढळून आलेली अनधिकृत तसंच वाढीव बांधकामं तात्काळ तोडण्यात आली. एका दिवसात तब्बल ६२४ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यापैंकी ३१४ ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली... तर ७ हॉटेलं सील करण्यात आली.


त्याचबरोबर ४१७ हून अधिक सिलिंडरही यावेळी जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी आयुक्तांसह ३ अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि ५०० वर कर्मचारी मैदानात उतरलेले दिसले.


एकाच दिवशी मुंबईतील सर्व २४ वॉर्डमध्ये कारवाई करण्यात आलीय. विशेष म्हणजे संबंधितांना नोटीस देण्याची औपचारीकताही न करता कारवाईवर भर देण्यात आलाय.