मुंबई: मुंबई उपनगरातून एक मोठी बातमी येत आहे. बोरिवली इथे इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरिवली इथल्या पश्चिम लिंक रोड येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती सध्या तरी मिळू शकली नाही. या आगीत मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. 



आग कोणत्या कारणामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची सध्या तरी माहिती हाती आलेली नाही. अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.