मुंबई : लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंड अग्नि दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू गुदरमरल्यामुळे झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये 12 जण जखमी झाले आहेत. मोजो बिस्ट्रो या रेस्टॉरंटमध्ये योग्य त्या सुविधा नव्हत्या. या रेस्टॉरंटच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती मिळतेय की, या मोजोमध्ये गायक सिद्धार्थ महाेवन याचे काही शेअर्स होते. असे सांगण्यात येत आहे. एफ अॅण्ड बी इंडस्ट्रीवाला, युग पाठक, युग थुली आणि प्रितिना श्रेसथा यांनी मिळून हे मोजो ब्रिस्ट्रो हे सुरू केलं होतं. त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी रेस्टॉरंटच्या सुविधांवर बोट ठेवण्यात आलं आहे. 14 मे रोजी मिड डे ने सिद्धार्थ महादेवनने ही बातमी प्रसिद्द केली होती. 


मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या दुर्घटनेत तीन पुरुष आणि 11 महिलांचा मृत्यू झाला. आठ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून चार मृतदेह अजूनही ताब्यात देण्यात आलेले नाहीत. केईएम रुग्णालयातील सर्व जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. 


कधी घडली ही घटना 


रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉटेल मोजोमध्ये ही आग लागली. बघता बघात आग वा-यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले व हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे. 


मोजो हे रेस्टॉरंट पूर्णतः शाकाहारी असून, या रेस्टॉरंटमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये tv9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.