मुंबई: वाईन शॉप मालकावर भरदिवसा गोळ्या झाडून त्याची हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील गोरेगाव विरवानी ईंडस्ट्री ईस्टेट जवळ सोमवारी (११ जून) घडली. सदनीसिंग चावडा असे गोळीबारात ठार झालेल्या वाईन शॉप मालकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यावर चावडा यांच्याजवळी पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. दरम्यान, घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.