नवरात्रीत दांडिया आणि गरबा आयोजनावर बंदी
Garba Program ban : नवरात्रीत दांडिया आणि गरबा आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटाचीच असावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेची नवरात्रौत्सवासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
मुंबई : Garba Program ban : नवरात्रीत दांडिया आणि गरबा (garba and dandiya) आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटाचीच असावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेची नवरात्रौत्सवासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नवरात्रौत्सवात गरबा आणि दांडियावर बंदी (garba and dandiya) घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत नियमावली जाहीर करण्यात आलीय. यात सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटांची तर घरगुती उत्सवासाठी 2 फुटांचं बंधन घालण्यात आले आहे. गरबा-दांडियाचे आयोजन न करता आरोग्य आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेत.
अशी आहे नियमावली
- सार्वजनिक मंडळांनी मंडप मर्यादित आकाराचे उभारावेत
- आरोग्य, रक्तदान शिबिरे, स्वच्छतेविषयी जनजागृती करा
- मंडपाच्या मुख्य द्वाराचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण
- प्रसाद वाटणे, फुले अर्पण करणे टाळावे
- आगमन-विसर्जनाला दहापेक्षा जास्त जण नसावेत
- मंडप आवारात हार, फुले, प्रसाद विक्री स्टॉल नको
- मंडपात एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त गर्दी नको
- विसर्जनस्थळी मूर्ती विभाग कार्यालयाकडे जमा कराव्यात
- कंटेंमेंट झोनमधील मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणू नये