मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये आज भीषण अग्नितांडव घडलं. गोरेगावमधल्या (Goregaon) जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग (Massive Fire) लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झालाय (8 Death) तर 58 जण जखमी झालेत त्यातल्या पाच  जणांची प्रकृती गंभीर  आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी दिले आहेत. दरम्यान केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतांच्या वारसांना मदत जाहीर
गोरेगावमध्ये इमारत अग्नितांडवातला मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने 2 लाखांची मदत जाहीर केलीय. तसंच 50 हजारांची मदत जखमींना जाहीर करण्यात आलीय. पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत दुःख व्यक्त केलंय. तर मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये.  जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे  तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा सुरू आहे.  स्क्रॅपमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांची मदत  करण्यात येणार आहे.  जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे .


या दूर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.'


या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


आग कशी लागली?
गोरेगावमधल्या समर्थ नावाच्या इमारतीती असलेल्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेतून 30 जणांना वाचवण्यात यश आलं असून 14 जण जखमी झाले. आगीत होरपळून 8 जणांचा मृत्यू झाला. आगीचं स्वरुप इतकं होतं की सुमारे 30 हून अधिक बाईक आणि 4 कार त्यात जळून खाक झाल्या आहेत. 


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ज्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.  आग कशी लागली याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तपास घेत आहे.  इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून तिथं असणाऱ्या जुन्या कपड्यांनी ती आणखी धुमसत गेली. आणि काही वेळातच संपूर्ण पार्किंग लॉटसह पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत ही आग पोहोचली.