मुंबई : जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची संपूर्ण अंमलबजावणी न केल्याप्रकरणी आम्ही एखाद्या पालिका आयुक्ताला तुरुंगात टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं आपला संताप व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त एम. रामास्वामी यांना कोर्टानं कारणे दाखवा नोटीस बजावलीय. सण, उत्सवातील बेकायदेशीर मंडपांवरून कोर्टानं पालिकेला फटकारलं आहे. तर बेकायदा मंडपांमुळं वाहतुकीला कुठलाही अडथळा येत नसल्याचा दावा नवी मुंबई पालिकेनं हायकोर्टात केलाय. 


ठाण्यातले सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात बेकायदा मंडप काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी मदत न केल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला. त्यावर तुम्ही तक्रार का केली नाहीत, असा सवाल कोर्टानं बीएमसीला विचारलाय. याप्रकरणाची पुढची सुनावणी ३० नोव्हेंबरला होणार आहे.