Mumbai Building Collapse Video : अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबईत शनिवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. तर रविवार हा मुंबईकरांसाठी घातवार ठरला. घाटकोपरमध्ये तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला तर दुसरीकडे दुपारी विलेपार्लेमध्येही तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ 


विलेपार्ले परिसरातील नानावटी हॉस्पिटलजवळील ग्राऊंड प्लस इमारत कोसळतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बँड बाजा बारात घेऊन जवळपास 20 ते 25 जण मोठ्या उत्साहात गल्लीतून जात आहे. त्यांनी विचारही केला नसेल की पुढच्या क्षणात त्यांच्यासोबत काय होणार. 


आनंदाने वाजत गाजत हे लोक जात होती तेवढ्यात इमारतीचा काही कोसळलं. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत. धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता थोडक्यात काही इतर लोकांचा जीव वाचला आहे. नाही तर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. (Mumbai heavy rain building collapse in vile parle video viral )


प्रिस्किला मिसौइटा (65 वर्षे) आणि रॉबी मिसौइटा (70 वर्षे) असं मृत व्यक्तींची नावं आहेत. तर त्यांचा 21 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.


मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीला आधार देणारे लोखंडी रॉड गंजले असल्याचं आढळून आलं. घटनेच्या वेळी मृत पावलेले जोडप दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या खालच्या घरातून वाजत गाजत जात असलेली मिरवणूक पाहत होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. त्याचवेळी त्यांचा मुलगा ग्रीलमध्ये अडकला त्यामुळे त्याला वाचवण्यात यश आलं.



ही इमारत 25 वर्ष जुनी असल्याचं बोलं जातं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही दुर्घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Mohsin shaikh या नावाच्या अकाऊंटवर तो शेअर करण्यात आला आहे.