मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी संपावरुन हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढल्याचं पहायला मिळत आहे. एसटी संप मिटवण्यासाठी काय ठोस पाऊल उचलताय? संप मिटविण्यासाठी काही धोरण ठरवलंय का? अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली आहे.


गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पूकारला आहे. ऐन दिवाळीत एसटी कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.