बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : आरेतील झाडे हटवण्याप्रकरणी आज उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी अरेची जागा निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी 2646 झाडे हलवावी किंवा तोडावी लागणार होती. प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात झोरु भाटेना यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आणखी काही याचिका दाखल झाल्या. त्यातील 4 याचिकांवर सुनावणी झाली. आजच्या उच्च न्यायालयाच्या निकालावर साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात आरे वनक्षेत्र आहे की नाही ? करशेडची जागा पुरक्षेत्रात येते की नाही ? आणि प्राधिकरणाच्या निर्णय यावर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे  यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.



याचिकाकर्ते, राज्य सरकार महानगरपालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे म्हणणे ऐकले आहे. आज यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.


मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरेतील झाडे हटवण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरी वैध की अवैध याचा निर्णय उच्च न्यायालय आज देणार आहे.