मुंबई : मुंबईत कचरा वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करांतून अद्याप सूट मिळालेली नाहीय. कचरा वर्गीकरण करून सुक्या आणि ओल्या कचऱ्याची तसंच सांडपाण्याची विल्हेवाट लावणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात 15 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची योजना होती.  महापालिकेनं 2019मध्ये ही योजना आणली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली.त्याअंतर्गत सुमारे दोनशे सोसायट्या पात्र ठरलेल्या असल्या तरी अद्याप या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत मिळालेली नाही. 



टाळेबंदीमुळे ही सवलत देण्याची प्रक्रियाच रखडलीय. येत्या एप्रिल महिन्यात तरी ही सवलत मिळणार का ? याकडे पात्र सोसायट्यांचं लक्ष लागलंय.