COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईत वांद्रे इथल्या एमएसआरडीसी कार्यालयात गोंधळ झालाय. गेले अनेक वर्षे पाठपुरावा करूनही पाली खोपोली रस्त्यावर पेडली गावाजवळच्या पुलाची दुरुस्ती न झाल्याने संतप्त आदिवासी विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातलाय.


लई भारी आदिवासी संस्थेचे कार्यकर्ते एमएसआरडीसीच्या कार्यालयात घुसले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संबंधित अभियंत्यावर शाई फेकत गोंधळ घालण्यात आला. 


या संस्थेच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीसाठी उपोषण करण्यात आलं होतं. त्यावेळी एमएसआरडीसी प्रशासनाने लवकरच काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं.