मुंबई : कमला मीलमधील पबमध्ये लागलेल्या अग्नी तांडव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठे ३ सदस्य नियुक्त करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत. निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समितीत हायकोर्टाच्या पॅनलवरील वास्तुरचनाकार आणि नगर विकास खात्याची निवृत्त सचिव दर्जाची व्यक्ती असावी. तसेच आठवड्याभरात समिती स्थापन करण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. 


मुंबई महापालिकेच्या कमिटीने न्यायलयीन चौकशीची गरज नाही, असे हायकोर्टाला सांगितले होते. मात्र आता हायकोर्टाने न्यायलयीन चौकशीचे आदेश दिले आहे.