मुंबई : नाकाबंदीस उभ्या असलेल्या पोलिसांना वाहन चालकांच्या रोषास अनेकदा सामोरे जावे लागते. याचाच प्रत्यय मुंबईतल्या खार भागात आला.   मुंबईत खार भागात नाकाबंदी करत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वारानं उडवलं आहे. हा दुचाकीस्वार एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिसाला काही अंतर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. अशा वर्तनामुळे नागरिकांना पोलीस आणि कायद्याची भितीच राहीली नाही का ? पोलिसांशी अरेरावी करण्याचा आणि कायदा तोडण्याचा माज येतो कुठून ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जखमी झालेल्या पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे पश्चिम भागातील रहदारीच्या रस्त्यावर ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झालीये. मुंबईतल्या बँन्ड स्टँडजवळ पोलिसांची आज नाकाबंदी होती. नाकाबंदीवेळी पोलीस वाहनचालकांना थांबवत होते. अशाच एका दुचाकीस्वाराला थांबवण्याचा पोलिसाने प्रयत्न केला. पण दुचाकीस्वार थांबलाच नाही.


पोलीस गंभीर जखमी 



 पोलीस त्याच्या दिशेने वळल्यानंतर त्याने  पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार आणि पोलीस दोघंही रस्त्यावर पडले. पण या घटनेत पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.