मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे(Kirit Somaiya) मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
याप्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्य सचिवांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच किरीट सोमय्या यांनाही याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन नियोजनकार आणि एक कक्ष अधिकाऱ्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 


किरीट सोमया यांचं स्पष्टीकरण
आपण कोणत्याही गोपनीयचेता भंग केलेला नाही, मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली असं स्पष्टीकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. किरीट सोमया यांचे फाईल्स चाळतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आपण कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती वाटत आहे का असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला.


काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.